मनोगत
‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की, आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या …